संकलनामध्ये 973 कोटींची कमी : वित्त मंत्रालयाची माहिती सादर : तीन महिने घसरणच
नवी दिल्ली
ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 86 हजार 449 कोटी रुपयांवर राहिले आहे. जुलैमध्ये हा आकडा 87 हजार 422 कोटी रुपये होता. जुलैच्या तुलनेत हे संकलन 973 कोटी रुपयांनी तसे कमीच झाले आहे, अशी माहिती वित्त मंत्रालयाने दिली आहे.
ऑगस्टमध्ये एकूण जीएसटी संकलनात सीजीएसटीचा हिस्सा 15,906 कोटी रुपये होता. एसजीएसटीचा वाटा 21,064 कोटी रुपये आणि आयजीएसटीचे संकलन हे 42,264 कोटी रुपये राहिले आहे. एसजीएसटी अर्थात राज्यांचा हिस्सा आणि सीजीएसटी अर्थात केंद्राचा वाटा होय.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार उपरोक्त संकलनामध्ये 19,179 कोटी रुपये सामानाच्या आयातीच्या माध्यमातून मिळाले आहेत. 7,215 कोटी रुपये सेसमधून आले आहेत.
घसरणीचे सत्र सुरुच
मागील तीन महिन्यापासून जीएसटी संकलनामध्ये सलगची घसरण येत राहिली आहे. जून महिन्यात 90,917 कोटी रुपये जीएसटी सरकारला मिळाला आहे. मे महिन्यात हा आकडा 62,151 कोटी रुपये राहिला होता. या प्रवासासोबत जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये संकलनात घसरण झाली आहे.
या राज्यांमध्ये संकलनात घसरण
देशातील प्रमुख राज्यांमध्ये दिल्ली, पश्चिम बंगाल, झारखंड आणि गोवा या राज्यांमध्ये जीएसटी महसूलात मोठी घसरण झाली आहे. तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि नागालँड या राज्यांमध्ये जीएसटीमध्ये वाढ झाली आहे.









