नव्याने एक पॉझिटिव्ह : एकूण 243 ‘कोरोना’बाधित, तर 65 रुग्ण सक्रिय
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिह्यात आणखी सहा ‘कोरोना’बाधित रुग्णांनी ‘कोरोना’वर मात केली असून या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 172 रुग्णांनी ‘कोरोना’वर मात केली आहे. रविवारी आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. सद्यस्थितीत 65 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिह्यात आतापर्यंत एकूण 243 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यातील बरे झालेल्या 172 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पाचजणांचा मृत्यू व एकजण मुंबईला गेल्याने सद्यस्थितीत 65 सक्रिय रुग्ण आहेत
जिह्यात शनिवारी आणखी सात व्यक्तींचा ‘कोरोना’ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यात कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील दोन, जानवली येथील तीन, मालवण तालुक्यातील आचरा येथील दोन असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन
देवगड तालुक्यातील तिर्लोट येथील एका घरापुरता परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तर कणकवली तालुक्यातील मौजे ओझरम तळीवाडी येथील 01 कि. मी. परिघ सर्व परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेनमेंट झोनमध्ये 17 जुलै रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रात नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकाऱयांनी दिले आहेत.
अ.क्र. विषय संख्या
1 तपासण्यात आलेले एकूण नमुने 4117
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने 4065
3 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 52
4 आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 243
5 निगेटिव्ह आलेले नमुने 3823
6 सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 65
7 इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण 1 (मुंबई)
8 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
9 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 172
10 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 104
11 रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 1,824
12 संस्थात्मक विलगीकरणातील एकूण व्यक्ती 15,491









