दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 162मिमी पाऊस : अतिवृष्टीचा इशारा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रविवारी पावसाचा जोर थोडा कमी झाला. मात्र, रिपरिप सुरू होती. दोन दिवसांच्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून पंचनामे सुरू आहेत. जिल्हय़ात अतिवृष्टीचा इशारा कायम आहे
दोन दिवस पडलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. छोटय़ा-छोटय़ा पुलांवर पाणी आले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, रविवारी पावसाचा जोर कमी झाला होता. दोडामार्ग तालुक्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 162 मि.मी. पाऊस झाला. जिल्हय़ात सरासरी 106.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून 2020 पासून ते आतापर्यंत जिल्हय़ात सरासरी 1549.225 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलिमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 162 (1460), सावंतवाडी 120 (1613), वेंगुर्ले 62.60 (1633.80), कुडाळ 80 (1403), मालवण 112 (2047), कणकवली 133 (1410), देवगड 106 (1404), वैभववाडी 79 (1423).









