आयात वाढून 1.87 कोटी टनावर – जून महिन्यातील आकडेवारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कोळसा आयात जून महिन्यात 50 टक्क्यांनी वाढून 1.87 कोटी टनावर पोहोचली आहे. एमजंक्शन सर्व्हिसेसकडून सदरची माहिती देण्यात आली आहे. वर्ष 2020 मधील जून महिन्यात भारताची कोळसा आयात 1.25 कोटी टनावर राहिली होती. एमजंक्शन ही कोळशासंदर्भात शोध अहवाल सादर करत असते.
एमजंक्शन सर्व्हिसेसच्या मते, जूनमध्ये कोळसा आयात 1.87 कोटी टन राहिली होती. एमजंक्शनच्या माहितीनुसार कोळसा आयात जून 2020 तुलनेत 50.05 टक्क्यांनी वाढली आहे. जून 2020 मध्ये देशाची कोळसा आयात 1.25 कोटी टन राहिली होती. जूनमध्ये प्रमुख आणि बिगर प्रमुख बंदरासह भारताची कोळसा आयात चालू आर्थिक वर्षात मे महिन्याच्या तुलनेत 5.76 टक्क्यांनी घटली आहे.
जूनमध्ये कोळसा आयातीच्या निश्चित केलेल्या ध्येयात काहीशी घसरण राहिली आहे. हा कल मान्सूनच्या दरम्यान कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
आयातीमधील हिस्सेदारी
कोळसा आयातीमध्ये जून महिन्यात नॉन कोकिंग कोलचा हिस्सा 1.30 कोटी टन राहिला असून कोकिंग कोळशाची आयात 24.6 लाख टनाने वाढून 40.6 लाख टनाच्या घरात राहिली आहे.









