आरोग्याधिकाऱयांची माहिती, डिचोली तालुक्यात लसीकरण मोहीम
प्रतिनिधी / सांखळी
रविवारी तालुक्मयात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही, मात्र सध्या 90 रुग्ण तालुक्मयात सक्रिय आहेत, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. बाजारात गर्जे शिवाय कोणीही फिरू नये, गर्दी करू नये, सामाजिक नियम पाळावेत असे आवाहन सरकारी आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर, डॉ. सिद्धी कासार, डॉ. उत्तम देसाई यांनी जनतेला केले आहे. सध्या तालुक्यात ठिक ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू आहे.
डिचोली तालुक्मयातील सांखळी, मये, डिचोली मतदारसंघात रविवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही, ही दिलासा देणारी बातमी असली तरी कोणीही गाफील न राहता सर्वांनी सर्व ती खबरदारी घेत सरकारी नियमांचे पालन करून कोरोना मुक्तीचा संकल्प यशस्वी करावा, असे आवाहन सभापती राजेश पाटणेकर यांनी डिचोलीत पत्रकारांशी बोलताना केले.
कोविड व्यवस्थापनात डिचोली तालुक्मयातील सर्वच घटकांनी चांगले काम केलेल्याची दाखल घेऊन नुकताच मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.









