वृत्तसंस्था /सॅन फ्रान्सिस्को :
सॅमसंगचा गॅलेक्सी झेड फोल्डचा स्मार्टफोन येत्या 3 ऑगस्टला लाँच करण्यात येणार आहे, असे समजते. सॅमसंग अनपॅक्ड इवेंटमध्ये कंपनी गॅलेक्सी नोट प्रकारामध्ये नवीन उत्पादनांसोबत गॅलेक्सी झेड फोल्ड 2 या मॉडेलचे सादरीकरण करणार असल्याची माहिती आहे.
सॅमसंगकडून गॅलेक्सी झेड फ्लिप 5 जी आणि गॅलेक्सी नोट 20 आवृत्तीचे सादरीकरण होण्याचे संकेत आहेत. या अगोदरही गॅलेक्सीच्या झेड फोल्ड 2 संदर्भातील माहिती बाहेर पडली होती. त्याचवेळी सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. गॅलेक्सी झेड फोल्ड 2 स्मार्टफोन 7.7 इंचाच्या स्क्रीन आणि 120 हर्ट्ज रीफ्रेश्ड किमतीसोबत बाजारात येणार आहे. स्नॅपड्रगन 865 प्लससह झेड फोल्डमध्ये डबल बॅटरी सेटअपसह अन्य सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.









