उत्तराखंडमधील चारधाम रेल्वेमार्गाची निर्मिती आता पूर्ण होत आली आहे. या रेल्वेमार्गाच्या अंतिम स्टेशननजीक एक रेल्वेपूल बांधण्यात येत असून तो कुतुबमिनरपेक्षाही दीडपट उंच असेल, असे सांगण्यात येत आहे. या पुलाचे गर्डर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून जुलै 2022 पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होणार आहे. हा भारतातील सर्वात उंच रेल्वेपूल असेल.

चारधाम रेल्वे प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात योगनगरी ते कर्णप्रयाग असा 125 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग तयार होणार आहे. दोन मोठय़ा पहाडांना जोडणारा हा रेल्वेमार्ग अनेक दऱया आणि बोगदे यांना पार करणारा आहे. हा प्रदेश डोंगराळ असल्याने अनेक ठिकाणी पूल आणि बोगदे निर्माण करावे लागणार आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यावरून 2024 पर्यंत रेल्वे धावू लागेल. एकाच वेळी सहा ठिकाणी याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे पूर्वनिर्धारित वेळेपेक्षाही आधी तो पूर्ण होणार आहे. कर्णप्रयाग स्थानकाच्या सिवई कालेश्वर येथील भागात या 125 मीटर उंच असणाऱया पुलाचे बांधकाम सुरू आहे. कुतुबमिनारची उंची 72.5 मीटर आहे. त्यामुळे हा रेल्वेपूल या मिनारापेक्षाही दीडपट अधिक उंच होणार आहे. त्याचे 60 टक्क्मयांहून अधिक काम पूर्ण झाले असून ही माहिती रेल्वे विभागाने ट्विटरवर दिली आहे.









