जोयडा : कुंभारवाडा ग्रामपंचायत वर प्रथमच भाजपची सत्ता आली आहे. कुंभारवाडा ग्रा. पं. अध्यक्षपदी विजयालक्ष्मी शशांक डेरेकर व उपाध्यक्षपदी आकाश अनस्कर यांची निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग जोयडाचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी विजयकुमार यांनी काम पाहिले. कुंभारवाडा ग्रामपंचायतवर एकूण 9 सदस्य आहेत. त्यातील पाच भाजपचे व चार काँग्रेसचे सदस्य आहेत. भाजपच्या सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरले होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसने नामपत्र दाखल न केल्याने भाजपच्या सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. पुंभारवाडा ग्रामपंचायत नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाला हार घालून मानवंदना दिली. यावेळी अश्वारुढ शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर उभे राहून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









