बोरगाव : येथील आयको स्पिनिंग मिल परिसरात मंजूर झालेल्या कूपनलिका खोदाईचा प्रारंभ युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पिण्याची पाणीटंचाई भासत होती. याबाबत युवा नेते उत्तम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नगर पंचायतीच्या 15 व्या वित्त योजनेतून सदर कूपनलिका मंजूर करून त्यासाठी 3 लाखाचा भरीव निधी मंजूर करून दिला आहे. आयको परिसरात स्थानिकांसह महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील अनेक ठिकाणची कुटुंबे उदरनिर्वाहासाठी आलेली आहेत. अशा सर्वच लोकांना या कूपनलिकेचा उपयोग होणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष संजय ऐदमाळे, नगरसेवक अभय मगदूम, अशोक माळी, सिद्धाप्पा हरळे, अलम मकानदार, अमर उमराणे, राजू आरगे, दादासो शिरदवाडे, सुभाष आरगे, अक्षय चौगुले, सचिन बेडकिहाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Previous Articleसौंदलगा शाळेत पालक मेळावा
Next Article कुंभारवाडा ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता









