वार्ताहर / कारदगा
2020 या वर्षाने पूर्णपणे कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वांनाच हादरवून सोडले तर अनेकांना काम नसल्याने जगणे मुष्कील झाले. त्यामुळे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी कारदगा येथील 40 लोकांना संसारोपयोगी साहित्याचे किट मंजूर केले असून त्यापैकी 15 लोकांना या किटचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी एपीएमसी सदस्य नितेश खोत स्वागत करून म्हणाले की, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासो जोल्ले यांनी कारदगा येथील हस्तकला व्यावसायिकांना संसारोपयोगी किट देऊन त्यांना आधार देण्याचे काम केले आहे.आज 15 लोकांना या किटचे वाटप करत आहोत व उरलेले 35 थोडय़ाच दिवसात देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या किटचे वितरण तालुका पंचायत सदस्य दादासो नरगट्टे, पंचायत सदस्य देवाप देवकते, सुकुमार माळी, वैशाली खराडे, रेश्मा जमादार, सुषमा गवळी, सोमनाथ गावडे, विनोद ढेंगे, संगीता खोत, त्रिशला माळी, धनपाल चव्हाण, निवधुत धनगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सत्याप्पा माळी, सोमा गावडे, बाबासो खराडे, दीपक अलंकार, जयसिंग शांडगे, शहाजी नाईक, सतीश खोत, अत्ताउल्ला पटेल, मलिक सरगुरु, रवी ऐवाळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. देवापा देवकते यांनी आभार मानले.









