नवी दिल्ली :
आर्थिक गती वाढल्यासोबत वीज विक्री ऑगस्टमध्ये कोविड19 च्या अगोदरच्या स्थिती जवळ पोहोचली आहे. मागील महिन्यात एकूण वीज विक्री 110.57 अब्ज युनिट राहिली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत सदर महिन्यातील वीज मागणी ही 0.85 टक्क्मयांनी कमी राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु या महिन्यात ही मागणी सामान्य पातळीवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
वीज विक्री विशेष रुपाने ऑगस्ट महिन्यात वाढली आहे. कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्याच्या 25 पासून लॉकडाऊन केले होते. यामुळे वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील हालचाली कमी झाल्याने गती मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. जुलैमध्ये विजेचा खप कमी होत 3.6 टक्क्मयांवर राहिला होता.
कधीपर्यंत सामान्य स्थिती
मे आणि एप्रिल महिन्यात विजेची विक्री क्रमश : 14.86 टक्के आणि 23.21 टक्क्मयांनी कमी झाली आहे. परंतु तज्ञांच्या माहितीनुसार सरकारकडून मिळणाऱया सवलतीमुळे वीज मागणी आणखी वेगाने वाढण्यास मदत होणार असून सप्टेंबर महिन्यापर्यंत ही स्थिती सामान्य पातळीवर पोहोचणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत.









