प्रतिनिधी /पणजी
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे आज बुधवार दि. 27 ऑक्टोबर रोजी तीन दिवसांच्या गोवा भेटीवर येत असून गुरुवार दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. ते विर्नोडा – पेडणे येथे सरकारी कॉलेजच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. त्यावेळी राज्यपाल श्रीधरन् पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.
आज बुधवारी दुपारी 12 वा. ते गोव्यात पोहोचणार असून थेट राजभवनवर जाणार आहेत. तेथेच त्यांचा मुक्काम असून शुक्रवार 29 ऑक्टोबर रोजी ते दिल्लीस परतणार आहेत.









