काही तालुकेच करतायेत उद्दीष्ट पूर्ण, अनेक रोजगारांना काम देण्यासाठी करावी लागतेय कसरत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना परिस्थित उद्योग खात्रीतील कामांना काही प्रमाणात स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता ही कामे पुन्हा जोमाने सुरू करण्यात आली असून तातडीने उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे. प्रत्येक तालुक्मयात हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांची धडपड सुरू आहे. नुकतेच अधिवेशनातून बाहेर पडलेल्या अधिकाऱयांना आता पुन्हा कामाला लागले आहेत. जिह्यातील बहुतेक तालुक्मयांमध्ये लवकरच हे उद्दीष्ट पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मागील काही वर्षे उद्योग खात्रीमध्ये जिह्याने उद्दिष्टापेक्षाही अधिक काम केले होती. मात्र आता मागील दोन वर्षांपासून सरकारकडून देण्यात आलेले उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी अधिकाऱयांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मागील काही वर्षांपूर्वी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱया या योजनेमध्ये ग्राम पंचायतींनी उत्स्फुर्तपणे विविध कामे करुन केंद सरकारकडून मिळणाऱया उद्योग खात्री योजनेचा लाभ घेत होती. आता मात्र रोजगारांना कामे कोणती द्यावी या विवंचनेतच अनेक तालुका पंचायत अधिकारी गुंतल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून देण्यात आलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आता तारेवरची कसरत करावी लागत आहे.
केंद्र सरकारने महात्मा राष्ट्रीय ग्रामीण उद्योग सुरु केला आहे. ती प्रभावीपणे राबविली जात आहे. त्यामुळे देशभरातच याचा गवगवा होत असल्याचे दिसून येत आहे. यापुर्वी अनेकवेळा उद्दीष्ट पूर्ण करण्यात आली आहेत. आता मात्र सर्वच ग्राम पंचायतमधून कामे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे काही रोजगार वारंवार आंदोलन आणि निवेदने देत असतात. मात्र काही ग्राम पंचायतींमधील सर्वच कामे पूर्ण झाल्याने कोणती कामे द्यायची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्रीतर्फे ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळावा व गावपातळीवर विकास व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. ही योजना राबवितानाच विविध तलावे, स्वच्छ भारत अभियान, रस्ते, गटारी यासह इतर कामांचा या योजनेत समावेश आहे. मात्र तालुका जिल्हाच हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न होत असताना तसेच गटारी आणि इतर कामेही पुर्ण झाली असताना या रोजगारांना कोणते काम द्यावे? असा प्रश्न ग्राम पंचायतींना पडून आहे. त्यामुळेच दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे.
काही गावातील रोजगार तर बाहेर ग्राम पंचायतीमधील हद्दीत कामे करण्यास तयार झाली आहेत. मात्र त्या ठिकाणीही हीच परिस्थिती असल्यामुळे रोजगार हमी योजनेतून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध कसा करुन द्यावा? हाच प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर उभा ठाकला आहे. यामुळे अनेक कामगार आपल्याला काम द्यावे, या मागणीसाठी जोरदार आंदोलने आणि मोर्चे काढत आहेत. दरम्यान उद्योग खात्री योजनेतून एकदा काम केलेल्या कामाला 10 वर्षापर्यंत ते काम करु नये, अशी अट आहे. याचा फटकाही काही ठिकाणी बसत असल्याचे समजते.









