मुंबई
सुप्रिया लाइफसायन्सेस समभागाने शेअर बाजारात दमदार आगमन केल्याचे दिसले. सदरचा कंपनीचा समभाग लिस्टींग होताना 55 टक्के अधिक प्रिमीयमसह 425 रुपयांवर लिस्ट झाल्याचे समजते. कंपनीने याची इशु किंमत 274 रुपये प्रति समभाग इतकी ठरवली होती. एनएसईवर हा समभाग 55 टक्के प्रिमीयमसह 421 रुपयावर खुला झाला. फार्मा क्षेत्रासाठी लागणाऱया आवश्यक घटकांची निर्मिती सुप्रिया लाइफसायन्सेस कंपनी करते.









