चिखलीतील संघटनेची पोलीस तक्रार
प्रतिनिधी /वास्को
आल्त दाबोळी भागातील विशाल मेगा मार्टजवळच्या निवासी वसाहतीतून भू गटाराचे पाणी उघडय़ा गटारातून सोडले जात असल्याची तक्रार चिखली बायोप्रुसेडर्स या संघटनेने केली आहे. दोन पोलिसांसह या प्रकाराची पाहणीही करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या संघटनेने कली आहे.
संघटनेचे सिरील फर्नांडिस व एडवीन मास्कारेन्हास यांनी यासंबंधी दिलेल्या पोलीस तक्रारीत आल्त दाबोळीतील विशाल मेगामार्टजवळील महा निवासी प्रकल्पाच्या दगडी कुंणातून सुव्यवस्थीतरीत्या या वसाहतीतील सांडपाणी या प्रकल्पाच्या खालील रस्त्याच्या गटारात सोडण्यात येत आहे. प्रक्रिया केलेले हे सांडपाणी भू गटारातून सोडणे आवश्यक असताना ते उघडय़ावर सोडण्यात येत असल्याने या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सदर सांडपाणी उघडय़ावर सोडण्यात येत असल्याने जवळच्या गावातील पारंपरीक जलस्त्राsत प्रदुषीत होणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या निवासी प्रकल्पाखालील गावात कुपनलीकाव्दारे जमीनीतील पाणी खेचले जाते. गावात त्याचा वापर होतो. तसेच या गावातील पाणी टँकरव्दारे इतर भागात पुरवले जाते. त्याचा पीण्यासाठीसुध्दा वापर होत असतो. त्यामुळे त्या महा निवासी प्रकल्पातून उघडय़ावर सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडण्याची भिती चिखली बायो प्रुसेडर्स या संघटनेने व्यक्त केली आहे.
या प्रकरणी संघटनेने रविवारी वास्को पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. तत्पूर्वी दोघा पोलिसांनी या प्रकराची प्रत्यक्ष पाहणी केली. गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडेही या संघटनेने तक्रार केलेली असून या प्रकाराची गोवा राज्य प्रदुषण मंडळाकडून पाहणी करण्यात येणार आहे. सांडपाणी उघडय़ावर सोडून भू गर्भातील पाण्याचा साठा प्रदुषीत करण्यास हातभार लावून लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचवण्याच्या या प्रकारात गुंतलेल्यांविरूध्द कडक कारवाई करावी अशी मागणी चिखली बायो प्रुसेडर्स या संघटनेने केली आहे.









