वार्ताहर /कांदोळी
नेरुल व वेरे येथे गेली चार दिवस तीव्र पाणी टंचाई झाल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. गोव्यातील जिव्हाळय़ाचा सण जवळ येऊन ठेपला असताना ही पाणी टंचाईची समस्या महिलांना भेडसावत आहे.आमदार जयेश साळगकरत् याबाबत काहीच करत नसल्याने महिला वर्ग नाराज झाली आहे
बाहेर सर्वत्र पाऊस पडत असून घरातील नळ मात्र कोरडे पडलेले आहेत.त्यामुळे महिला वर्ग चिंतेत दिसत आहेत. अनेक वेळा पर्वरी येथील पाणीपुरवठा खात्यावर मोर्चा घेऊन गेले असता येथील अधिकारी वीज पुरवठा खंडित होता किवां पाईप लाईन फुटलेली आहे अशी करणे सांगून वेळ मारून नेत आहेत.लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करू असे आश्वासन देत त्यांची बोलावण करून आपली सुटका करून घेतात. त्यानंतर चार दिवस सुरळीत पाणीपुरवठा होतो. पण नंतर ’ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती होते.त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत.
वेरे ,नेरुल हा परिसर पाणीपुरवठा पुरवठा नियोजनानुसार शेवटचा भाग असल्याने येथे कमी दाबाने पाणीपुरवठा पुरवठा होता आहे.ही समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी संबंधित अधिकाऱयांना सर्वात अगोदर वेरे येथील मुख्य साठवण टाकी भरून घ्या व नंतर टप्या टप्याने अन्य भागातील टाक्मया भरा.त्यामुळे सर्वाना पुरेसे पाणी मिळेल. अशी सूचना केली होती.काही दिवस हा प्रयोग यशस्वी झाला पण मध्येच हॉटेल,टेंकर लॉबी दादागिरी करून आपल्या मर्जीनुसार पाणीपुरवठा करून घेत आहेत.याचा फटकाही स्थानिक लोकांना होत आहे.
तसेच वेरे,नेरुल पंचायत आपल्या स्वार्थासाठी बेसुमार पंचतारांकित हॉटेल बांधकामासाठी परवाने देत सुटले आहेत. वेरे नेरूल भागात त्वरित पाण्याची समस्या सोडवावी नाहीतर या भागातील पाण्यासाठी आंदोलन छेडले जाईल असा सूर ग्रामस्था?कडून येत आहे









