चंदीगढ / वृत्तसंस्था
पंजाबच्या शेतकऱयांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू केल्यापासून राज्यात अवैध शस्त्रांची तस्करी आणि विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केले आहे. तसेच खलिस्तानी हस्तकांनी सदस्यभरती सुरू केल्याचेही वृत्त आहे. अमरिंदरसिंग यांची मुलाखत एका वृत्तसंस्थेने प्रसारित केली आहे. त्यात यांनी हे दावे केले. त्यांनी ग्रेटा थनबर्ग या पर्यावरणवादी कार्यकर्तीवरही टीका केली. ही विदेशी कार्यकर्ती आता आम्हाला ‘अर्हतिया’ पद्धतीचे धडे देणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. अर्हतिया ही पंजाब सरकारची योजना असून ती शेतकऱयांशी संबंधित आहे.









