वृत्तसंस्था/ बार्सिलोना
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बार्सिलोना खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉप सिडेड राफेल नदालने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना जपानच्या निशीकोरीचा पराभव केला.
सध्या क्रमवारीत तिसऱया स्थानावर असलेल्या नदालने आतापर्यंत 11 वेळा बार्सिलोना स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. 2014 आणि 2015 साली जपानच्या निशीकोरीने ही स्पर्धा जिंकली होती. पुरुष एकेरीच्या सामन्यात नदालने निशीकोरीचा 6-0, 2-6, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. नदालचा पुढील फेरीतील सामना ब्रिटनच्या नुरीशी होणार आहे. त्याचप्रमाणे ग्रीकच्या सित्सिपसने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या मिनॉरचा 7-5, 6-3, कॅनडाच्या ऍलीसिमेने आपल्याच देशाच्या शेपोव्हॅलोव्हचा 6-2, 6-3, रशियाच्या तृतीय मानांकित रुबलेवने स्पेनच्या व्हिनोलासचा 6-4, 6-7 (4-7), 6-4, इटलीच्या सिनेरने स्पेनच्या ऍग्युटचा 7-6 (11-9), 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.









