प्रतिनिधी / सांगली
जिल्हा कारागृहमध्ये ज्या कैद्यांना त्रास होत होता त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये 62 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना आता कारागृहातच एका बाजूला ठेवण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी दिली.
गेल्या चार महिन्यापासून कारागृहात एक ही कैदी पॉझिटिव्ह आढळून आला नव्हता. परंतु, काही दिवसापासून जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी त्यामुळे कैद्यांचे वाढलेले प्रमाण त्यांच्या इन्कमिंगमुळे या कैद्यांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या सर्व कैद्यांची तब्येत चांगली असल्याची माहिती त्यांनी दिली. उपचार म्हणून या कैद्यांना आता अलगीकरण कक्षात ठेवण्यात येऊन त्याठिकाणी त्यांच्यावर डॉक्टरांच्या कडून उपचार करण्यात येणार आहेत.








