सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील शाहूनगर येथील रहिवाशी व सध्या आंबेजोगाई येथे न्यायाधीश असलेले चंद्र मोहन खारकर यांचे मोठे बंधू ॲड. राम मोहन खारकर (वय 37) यांच्यावर अज्ञात लोकांनी गाडी अडवून प्राणघातक हल्ला केला. शाहूनगर चौकात शनिवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात खारकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.









