नवी दिल्ली
स्मार्टफोन ब्रँड शाओमी कंपनी आपला नवीन स्मार्टफोन शाओमी 11 आय सादर करण्याच्या तयारीत आहे. सदरचा 120 डब्ल्यू क्षमतेचा फास्ट चार्जिंगचा फोन 6 जानेवारीला लाँच केला जाणार आहे.
हायपर चार्ज स्मार्टफोन अमोलेड डिस्प्लेसह फुल्ल एचडी प्लस रिझोल्युशनसह 6.67 इंचाची स्क्रीन याला असणार आहे. सुरक्षेसाठी गोरीला ग्लासचे आवरण असेल. साईड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनरची सोय असणाऱया या फोनमध्ये 108 मेगा पिक्सलचा कॅमेरा तर 4500 एमएएचची बॅटरी याला असेल.









