प्रतिनिधी / मालवण:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी गाव भेटदौऱयाचे आयोजन केले आहे. कुडाळ मालवण तालुक्यातील विविध गावांमधील ग्रामपंचायतींना भेट देऊन शाळांमध्ये क्वारंटाईन व्यवस्थेचा आढावा ते घेणार आहेत. शनिवारपासून या दौऱयास सुरुवात करण्यात आली.
सकाळच्या सत्रात गोठणे, रामगड, आडवली मालडी, श्रावण, पळसंब, या गावातील ग्रामपंचायतींना आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित असलेले सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य व गाव कमिटीशी चर्चा करीत गावातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. गावातील समस्या अडचणींचा आढावा घेतला. काही समस्या त्याचवेळी संबंधित अधिकाऱयांशी संपर्क करून मार्गी लावण्यात आल्या.
यावेळी गोठणे येथे बाळा परब, सरपंच श्रेया चव्हाण, उपसरपंच राजेंद्र लाड, रामगड येथे विलास घाडीगावकर, अमित फोंडके, ग्रा. प. सदस्य श्यामसुंदर घाडीगावकर, ग्रामसेवक दयानंद कांबळे, पोलीस पाटील नारायण जिकमडे, अंगणवाडी सेविका लीना मेथर, बंडू गावडे, आशासेविका सायली सारकर तर श्रावण येथे प्रवीण परब, सरपंच प्रशांत परब, दुलाजी परब, ग्रा. पं. सदस्य प्रमोद घाडी आदी उपस्थित होते.









