प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार नारायण कोरगप्प यांची बिनविरोध निवड झाली आहे. अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या पोटनिवडणुकीत केवळ नारायण कोरगप्प यांनी अर्ज दाखल केला असून सोमवारी सायंकाळपर्यंत अधिकृतपणे त्यांना विजयी घोषित करण्यात येईल. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर निवडणूक अधिकारी तथा विधानसभा सचिव एम. के. विशालाक्षी हे विजयी उमेदवारचे नाव घोषित करणार आहेत.
विधानसभेत आमदारांचे संख्याबळ कमी असल्याने विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि निजदने राज्यसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. जर निवडणूक झाल्यास भाजप उमेदवाराचाच विजय निश्चित आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आपला उमेदवार रिंगणात उतरविलेला नाही. यामुळे भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड होणार आहे. अशोक गस्ती यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.









