बेंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये कोणतेच मतभेद नाहीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. बळ्ळारी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात भाजप सरकार सत्तेवर असूनसुद्धा अन्य पक्षातील नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. हा काँग्रेसवर जनतेने ठेवलेला विश्वास आहे. आगामी निवडणुकीत कोणाला तिकिट द्यावे हा निर्णय आम्ही घेणार नाही. तर तुम्ही सूचविल्या नेत्याला आम्ही उमेदवार म्हणून घोषित करण्यास तयार आहे. उत्तर कर्नाटकासह राज्यभरात आपण सर्वांनी एकत्र येऊन पक्षसंघटनेसाठी परिश्रम घेतले पाहिजे. त्यानुसार काँग्रेस पुन्हा सत्तेवर आणूया. यासाठी मी येथूनच प्रवास हाती घेतला आहे, असेही शिवकुमार म्हणाले.
Previous Articleकोल्हापूर : मलकापूर ते उचत रस्त्याची चाळण
Next Article राज्यसभा पोटनिवडणुकीत नारायण कोरगप्प बिनविरोध ?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









