मार्केट पोलिसांची कारवाई, 3 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
रविवारपेठ येथील एका मटका अड्डय़ावर छापा टाकून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या जवळून 3 हजार 50 रुपये जप्त करण्यात आले आहे.
मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. रविवारपेठ येथील कांदा मार्केटजवळ कल्याण मटका सुरू असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून चौघा जणांना अटक करण्यात आली आहे.
अश्पाक कुतबुद्दीन हुक्केरी (वय 49, रा. उज्ज्वलनगर), मोहन नारायण जाधव (वय 55, रा. आंबेडकर गल्ली), करण मारुती गुंजीकर (वय 25, रा. कामत गल्ली), गजानन गरडे (वय 30, रा. कामत गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. कर्नाटक पोलीस कायदा कलम 78 अन्वये त्यांना अटक करण्यात आली आहे.









