वार्ताहर/ धामणे
नागेनहट्टी (ता. बेळगाव) येथे नवरात्र उत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे घटनस्थापनेपासून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली आहे. येथील ब्रम्हलिंग मंदिरात पूजन करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. त्यानतंर प्रेरणामंत्राने दौडला सुरुवात झाली. ही दौड गावभर फिरून पुन्हा ब्रम्हलिंग मंदिर येथे येऊन यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्याच धारकऱयांच्या उपस्थितीत दौड सुरू आहे. रविवार दि. 25 रोजी दौडची सांगता होणार आहे.









