प्रतिनिधी / बेळगाव
गर्लगुंजी येथील राहुल बिदरभावीकर हा 20 वर्षीय युवक किडनी विकाराने त्रस्त असून, बेळगावच्या श्री प्रभा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. राहुल 20 वर्षाचा असून, तो रोजंदारीवर काम करत होता. मात्र कोरोनामुळे सध्या त्याचे काम बंद झाले आहे. वडील गवंडी काम करीत असून, आईसुद्धा मोलमजुरी करते. त्याच्या उपचाराचा खर्च पालकांना परवडणारा नाही. त्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांना या कुटुंबाला मदत करावयाची आहे त्यांनी कर्नाटक ग्रामीण विकास बँक शाखा गर्लगुंजी येथील त्याच्या बँक खाते 89059682631 या खात्यावर जमा करावी. त्याचा आयएफएससी कोड केव्हीजीव्ही0002603 असा आहे. अधिक माहितीसाठी 90712 07625 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे..









