प्रतिनिधी/ बेळगाव
बुलकच्या ई-बैठकीत अनिल आजगावकर यांनी विंदा करंदीकर यांच्या कवितांचा प्रवास अभ्यासू पद्धतीने उलगडला. बहुआयामी, बहुश्रुत, बहुसंस्कारी परंपरा कालानुरूप बदलत गेलेल्या 700 हून अधिक कविता देतानाच त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणारे विंदा हे एक अद्भूत रसायन होते, असे ते म्हणाले.
इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या विदांच्यावर इंग्रजी, साहित्य, शास्त्रज्ञ, केशवसूत, मर्ढेकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. मी मार्क्सवादी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. विंदांनी एकीकडे भाव कविता, प्रेम कविता, बाल कविता लिहिल्या. त्याचवेळी समाजभान जागे करणाऱया कविताही लिहिल्या. त्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा यथोचित गौरव झाला, असे आजगावकर म्हणाले.









