ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनमध्ये आजपासून ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीचा पहिला डोस एका 82 वर्षीय वृद्धाला देण्यात आला. ब्रायन पिंकर असे लस दिलेल्या वृद्धाचे नाव असून, त्यांना चर्चिल रुग्णालयात हा डोस देण्यात आला.
ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लसीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर रेग्युलेटरी एजन्सीच्या शिफारसी स्विकारण्यात आल्या असून, 18 वर्षावरील व्यक्तिंना ही लस देण्यात येणार आहे.









