शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत संस्था अध्यक्षांच्या कारभाराची चिरफाड
पंधरा दिवसात शाळेत सीसीटीव्ही बसणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
जयभारत शिक्षण संस्थेचे संस्थापक परशराम जाधव यांच्यावर मुख्याध्यापकाला धक्काबुक्की, महिलांना आर्वाच्च भाषा यासह 38 आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत संस्था अध्यक्षांच्या कारभाराची चिरफाड करण्यात आली. तरीही मी तक्रारी विषयी काहीच बोलणार नाही, चौकशी समितीसमोर माझी भुकिमा मांडणार, असे संस्था अध्यक्ष परशराम जाधव यांनी बोलताच शिक्षक संघटनांसह कृती समितीचे सदस्य आक्रमक झाले. या सदस्यांनी गोंधळ केल्यानंतर संस्था अध्यक्षांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करीत, येथून पुढे मी शिक्षकांना त्रास देणार नाही, असे आश्वासन दिले.
मुख्याध्यापकासह शिक्षकांना होणाऱ्या त्रासंदर्भात पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार जयंत आसगावकर यांनी समन्वय साधण्यासाठी सोमवारी मुख्याध्यापक संघात बैठक बोलावली होती. या बैठकीत लेखी 38 तक्रारीचे निवेदन अन्यायग्रस्त शिक्षकांनी सादर केले. यावर संस्थाचालकांना आमदार आसगावकर यांनी आपली भुमिका मांडण्याचे आदेश दिला. तरीही संस्था अध्यक्षांना आपल्यावरील आरोप फेटाळून लावण्याची प्रयत्न केला. शिक्षकांनी पुरावे सादर केल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला.
आमदार आसगावकर यांनीही कडक शब्दात खडसावल्याने संस्था अध्यक्षांनी मागार घेत घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर येथेच या बैठकीला पूर्णविराम देण्यात आला. दरम्यान संस्था अध्यक्षांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासंदर्भात शिक्षण प्रशासक एस.के. यादव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली होती. चौकशी दरम्यान अध्यक्षांनी अपशब्द वापरल्याने पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी करण्याची मागणी समितीने केली होती. यावरून नागरी कृती समितीचे रमेश मोरे यांनी प्रशासकासह संस्था अध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले









