प्रतिनिधी /बेळगाव
बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिराची स्वागत कमान उभारण्यात येत आहे. गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते या स्वागत कमानीचा कॉलम भरणीचा कार्यक्रम पार पडला. काकती येथील उद्योजक अभिजीत मोरबाळे यांच्या हस्ते कॉलम भरणी करण्यात आली. यावेळी पीडीओ स्मिता चंदरगी व अभिजीत मोरबाळे यांचा नागनाथ देवस्थान कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला.
नागनाथ देवस्थान कमिटीतर्फे बेकिनकेरे-गोजगा मार्गावर भव्य स्वागत कमान उभारण्यात येत आहे. याकरिता देवस्थान कमिटीतर्फे 2 लाखाचा निधी खर्ची घालण्यात येणार आहे. दि. 3 व 4 डिसेंबर रोजी मंदिराचा चौथा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत.
याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्षा छबुताई कांबळे, उपाध्यक्षा गंगूबाई गावडे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा भोगण, उपाध्यक्ष गुंडू पाटील, सदस्य आनंद धायगोंडे, मल्लाप्पा गावडे, यल्लाप्पा मल्लू गावडे, भावकू सावंत, परशराम भातकांडे, पुंडलिक सावंत, बळवंत सावंत, लक्ष्मण गडगाणे, सुरेश सावंत, मारुती खादरवाडकर, पुंडलिक भडांगे, नारायण बेळगावकर, सागर राजगोळकर, शिवाजी बसरीकट्टी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.









