प्रतिनिधी /बेळगाव
सेंट झेवियर्स हायस्कूल कॅम्प बेळगाव आणि 25 कर्नाटका बटालियन एनसीसी ज्युनियर विंगतर्फे एनसीसी दिनानिमित्त लुमेक्स आश्रम महालक्ष्मीनगर बेळगाव येथे शाळेचे एनसीसी छात्र आणि एनसीसी ऑफिसर संतान मेंडोसा यांनी भेट दिली. आश्रमामध्ये असलेल्या निराश्रीतांना फळे, मिठाई आणि आहार धान्य वितरण केले. या कार्याला 25 कर्नाटक बटालियन कर्नल राजीव सहानी आणि शाळेचे प्रिन्सिपॉल फादर थॉमस चंपकरा यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.









