प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बुरूड गल्ली येथे सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱया सहा जुगाऱयांना खडेबाजार पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 हजार 70 रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
बसवराज इराप्पा वर्ती (रा. कार पार्किंग, बापट गल्ली), गजानन उर्फ महेश यल्लाप्पा काकतीकर (रा. बुरूड गल्ली), विजय सिध्दाप्पा कातकीकर, सुरज उर्फ राजू सिध्दाप्पा काकतीकर (दोघेही रा. मेदार गल्ली), परशराम फकिराप्पा किणेकर (रा. बुरूड गल्ली) आणि दीपक बेळगावकर (रा. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बुरूड गल्ली येथे जुगार खेळत असल्याची माहिती खडेबाजार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक धिरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. मुष्टगी, महिला पोलीस हवालदार मल्लम्मा अंबडगट्टी, हवालदार एस. एम. शिंदे, बी. डी. बगाणी, केशवमूर्ती कलगुडी, आंबरेश बेळ्ळीहाळ, धनराज यलगार, गोपाळ हंदी, बसवराज उज्जीनकोप्प यांनी ही कारवाई केली आहे.









