ऑनलाईन टीम / काबुल :
काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने आपला मोर्चा पंजशीर प्रांताकडे वळवला. मात्र, याठिकाणी तालिबानला मोठा झटका बसला.
पंजशीरमधील बंडखोरांनी तालिबानच्या दहशतवाद्यांवर घातपाती हल्ला केला. यात 300 तालिबानी मारले गेले.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पंजशीर खोऱ्यातील बंडखोर एकत्र आले आहेत. यातील बहुतांश लोक अफगाण लष्कराचे सैनिक असून, त्यांचे नेतृत्त्व अहमद मसूद करत आहेत. पंजशीरमध्ये 9 हजार बंडखोर सैनिक आहेत. दरम्यान, स्थानिक बंडखोरांनी तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे काढून घेतले आहेत. मात्र, तालिबान्यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. उलट तालिबाननेच पंजशीरच्या दोन जिल्ह्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे.









