प्रतिनिधी /बेळगाव
भावा-बहिणीमधील प्रेम वृद्धींगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. बेळगाव शहरासह परिसरात रविवारी रक्षाबंधन सण साजरा झाला. यावषी साप्ताहिक सुट्टी असल्याने नागरीकांनी उत्साहाने रक्षाबंधन साजरे केले.
रक्षाबंधनासाठी सकाळपासून महिलांची धावपळ सुरू होती. बाहेर गावी जाणाऱया नागरीकांना विकेंड फर्फ्यूचा फटका बसला. त्यामुळे अनेकांना भावाला राखी बांधणे शक्मय झाले नाही. जवळ असणाऱया बहिणींनी भावांना राखी बांधून औक्षण केले.
स्विटमार्टच्या दुकानांसमोर रांगा
भावाला राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ भरविला जातो. काही महिला घरीच गोड पदार्थ तयार करतात. परंतु नोकरदार तसेच इतर महिलांचा मात्र तयार मिठाई खरेदीकडे ओढा दिसून आला. त्यामुळे रविवारी सकाळपासून स्विटमार्टच्या समोर नागरीकांची गर्दी दिसून आली. परंतु विकेंड फक्मर्युमुळे दुपारनंतर स्विटमार्ट बंद करावी लागली.
विविध संघटनांचे अनोखे रक्षाबंधन
प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही विविध संघटनांकडून रक्षाबंधन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने सेवा देणारे पोलिस, अग्निशमन जवान, पत्रकार यांना राखी बांधून त्यांना औक्षण केले. याचसोबत इतर संघटनांनीही कोरोना योद्धांना राखी बांधली.









