वृत्तसंस्था/ दुबई
चौदाव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया टप्प्याला येथे 19 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील काही खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत खेळत होते. आता या संघातील खेळाडूंचे इंग्लंडमधून दुबईत आगमन झाले आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघातील रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि उमेश यादव यांचे रविवारी दुबईत आगमन झाले असून त्यांना आयपीएलच्या नियमानुसार सहा दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.









