बेळगाव
शब्दविद्या कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच महाराष्ट्र शाखा बेळगाव यांच्यावतीने सोमवारी तिसरे शेकोटी कविसंमेलन शहापूर येथील सिद्धार्थ फ्री बोर्डिंगमध्ये उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ये÷ कवयित्री प्रतिभाताई आपटे, चैतन्य हलगेकर, निपाणीचे सुप्रसिद्ध कवी किरण मेस्त्राr उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी होते.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी ज्ये÷ कवयित्री प्रतिभाताई आपटे यांनी ‘वलवार नाव वल्हवली, नौका चाले कशी जलावरी’ हे गीत सादर केले. निमंत्रित कवी किरण मेस्त्राr यांनी ‘धर्म मानत नाही मी जात मानत नाही’, विश्वनाथ मुरगोडी यांनी ‘कोरोना’, आरती पाटील यांनी ‘सावित्रीबाई फुले’ यासह अस्मिता आळतेकर, भरत गावडे, अंजली देशपांडे, स्वप्निल जोगाणी, जितेंद्र रेडेकर, संदीप मुतगेकर, धनश्री मुचंडी, प्रा. मनीषा नाडगौडा, प्रा. कविता फडके, यल्लाप्पा पालकर आदींनी कविता सादर करून रंगत आणली.
साहित्यिक गुणवंत पाटील यांनी ‘कविता’ या शीर्षकाच्या कवितेतून काव्यसृजनाने नेमके चित्रण स्पष्ट केले.
प्रास्ताविक कार्याध्यक्ष स्वप्निल जोगाणी यांनी केले. याप्रसंगी स्मिता किल्लेकर, निकिता भडकुंबे, मेघा भंडारी, प्रा. भरमा कोलेकर आदी उपस्थित होते. संदीप मुतगेकर यांनी आभार मानले.









