मुठभर आंदोलकांसाठी नागरिक वेठीस : 5 ते 6 कि.मी. लांबीच्या वाहनांच्या रांगा
प्रतिनिधी /बेळगाव
सुवर्णसौध परिसरात येणाऱया कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना हिरेबागेवाडी टोल नाक्मयाजवळ रोखण्यात आले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर करवेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे तब्बल दीड तास वाहतूक रोखण्यात आली. यामुळे 5 ते 6 कि.मी. लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या. तासन् तास वाहनांमध्ये बसून राहिल्याने वाहनचालक व प्रवाशांचीही घालमेल वाढली होती. आंदोलन तुमचे मग त्रास आम्हाला का? अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक महामार्गावर व्यक्त करत होते.
करवेचे मोजके कार्यकर्ते बेंगळूर येथून सुवर्णसौध येथे येणार होते. अधिवेशन परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या आंदोलकांना हिरेबागेवाडी टोल नाक्मयानजीक पोलिसांनी रोखले. यामुळे कार्यकर्त्यांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करत महामार्ग रोखण्यात आला. हुबळीवरून बेळगावच्या दिशेने येणारी वाहने रस्त्यामध्येच अडकून पडली. याचा फटका अधिवेशनासाठी बेंगळूर येथून येणाऱया सरकारी अधिकाऱयांनाही बसला. ऍम्बुलन्स तसेच इतर अतिदक्षता सेवा देणारी वाहनेही यामध्ये अडकल्याने संताप व्यक्त केला जात होता.
एम. के. हुबळीपर्यंत वाहनांचा रांगा
हिरेबागेवाडी टोल नाक्मयापासून एम. के. हुबळीपर्यंत वाहने अडकली होती. इतर मार्गही उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना तासभर या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. बऱयाच जणांना वाहने कशासाठी थांबली आहेत. याबद्दल कल्पनाही नव्हती. अनेकांना आरोग्याच्या समस्या असल्याने त्यांची घालमेल सुरु होती. अनेकांना महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात या परिसरात जायचे होते.









