माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती
डिचोली / प्रतिनिधी
शिक्षा व्हिजन डिचोलीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेटय़े यांचा वाढदिवस मुळगाव येथील त्यांच्या कार्यालयात साजर करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांदेकर, माजी आमदर गणेश गावकर, किरण कांदोळकर व इतरांनी उपस्थिती लावली होती. सकाळपासून डिचोली शहरात आणि ग्रामीण भागात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मुळगाव येथे संध्याकाळी डिचोली मतदारसंघातील मोठय़ा संख्येने लोकांनी उपस्थिती लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी डॉ. चंद्रकांत शेटय़े यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
सकाळी डिचोली मतदार संघातील विविध भागात कार्यरत असलेल्या वीज कर्मचारी, लाईनमन हेल्पर यांचा डॉ शेटय़े यांच्या हस्ते भेटवस्तू व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. डिचोली अग्निशमन दलाचे सर्व जावान ज्यांनी तौक्ते वादळ तसेच पावसात जनतेची सेवा करताना अविश्रांत मदत केली, त्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला तसेच विविध ठिकाणी सेवा उपक्रम हाती घेण्यात आले.
यावेळी डॉ दिनेश आमोणकर, संजय शेटय़े, नारायण बेतकेकर, गुंजन कोरगावकर, दिलीप धारगळकर तसेच इतर उपस्थित होते.
सामाजिक सेवा उपक्रम सतत हाती घेताना गरजवंतांना मदतीचा हात देण्यासाठी आपण सतत कार्यरत राहू. या कामात आपल्याला मोठे समाधान मिळते. डिचोली मतदारसंघाला एका उंचीवर नेण्यासाठी आपण सदैव कार्य करणार. समस्यामुक्त डिचोली मतदारसंघाची निर्मिती करताना एक आदर्श मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाचे नाव वर आणण्यासाठी आपण कार्य करणार, त्यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे, असे डॉ शेटय़े यांनी सांगितले. सायंकाळी मुळगाव येथे कार्यलयात स्नेह मेळावा संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्या दिल्या.









