सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील जोर या गावात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन घरात स्वयंपाक करत असलेल्या अनिता पांडुरंग सपकाळ (वय 37) व त्यांचा मुलगा सचिन पांडुरंग सपकाळ (19) हे दोघे घरासह वाहून गेले असून, दुसऱ्या दिवशी ही त्यांचा शोध लागला नव्हता.
या गावातील सर्वांची भात शेती वाहून गेली आहे. तसेच या गावाकडे जाणारे सर्व साकव पूलही वाहून गेले आहेत. या परिसरात गेले तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. हे गाव आदिवासी क्षेत्र म्हणून घोषित असून, वाई प्रशासन अद्याप गावापर्यत पोहचले नाही,असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.









