वृत्तसंस्था/ हरारे
झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू लान्स क्लुसनर यांची नियुक्ती केल्याची घोषणा झिम्बाब्वे क्रिकेटने सोमवारी केली.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाची बैठक बोलाविण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये लान्स क्लुसनर यांची फलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये झिम्बाब्वे वनडे संघाच्या कर्णधारपदी पेग इर्वीन तर कसोटी संघाच्या कप्तानपदी सिन विल्यम्सची नियुक्ती करण्यात आली आली. 2016 आणि 2018 साली क्लुसनर हे झिम्बाब्वे संघाचे फलंदाज प्रशिक्षक होते. अलीकडे अफगाणच्या राष्ट्रीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी क्लुसनर यांच्याकडे सोपवली गेली होती. लवकरच गोलंदाज प्रशिक्षक आणि फिटनेस ट्रेनरची नियुक्ती केली जाईल, असे झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.









