प्रतिनिधी/ सातारा
महिला दिनादिवशीच अंगणवाडी महिलांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्यावतीने थाळीनाद व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. सदरचे आंदोलन पोवईनाका येथील छत्रपती व मदतनीस पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आले.
यावेळी महिलांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, मानधनात वाढ करावी, मानधनाऐवजी पगार द्यावा, पोषण ट्रकर ऍप मराठीतून मिळावे, नवीन मोबाईल मिळावा, मिनी अंगणवाडी सेविकांना दर्जा मिळावा, रिक्त जागांची भरती त्वरीत करी, पर्यवेक्षिका भरती प्रशासनामार्फत करावी, सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे पूर्ण वेळ काम करणाऱया अंगणवाडी सेविकांना किमान वेतन मिळाले आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले. तसेच आपल्या मागण्या मांडून लक्षवेधी असे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राज्याध्यक्ष सुजाता रणनवरे, जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरेकर यांच्यासह इतर पदाधिकारी ही उपस्थित होत्या.








