डिसेंबर महिन्यात 146 मुलांचा मृत्यू
जोधपूरः
राजस्थानात मुलांच्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोटा येथील रुग्णालयातील नवजातांच्या मृत्यूचे सत्र अद्याप थांबलेले नाही. अशा स्थितीतच मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा गृहजिल्हा असलेल्या जोधपूरमध्ये डिसेंबर महिन्यात 146 मुलांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयाच्या शिशू विभागात प्रतिदिन सरासरी 5 मुलांचा मृत्यू होत आहे. डिसेंबर महिन्यात रुग्णालयात 146 मुलांची अखेरचा श्वास घेतल्याची माहिती एस.एन. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. राठौड यांनी दिली आहे.
2019 मध्ये रुग्णालयात एकूण 754 मुलांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी 62 मुलांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. तर डिसेंबर महिन्यात हे प्रमाण अचानक वाढून 146 वर पोहोचले आहे.









