प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात रविवारी कोरोनाचे नव्याने 93 रूग्ण आढळून आल़े तर 4 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े मागील काही दिवसांपासून रूग्णसंख्येत घट होत असल्याचे दिसत आह़े उपचारातील संख्याही कमी झाली आह़े केवळ 273 लक्षणे असलेले रूग्ण असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हय़ात रविवारी कोरोनाच्या केवळ 3 हजार 263 चाचण्या करण्यात आल्य़ा यात आरटीपीसीआरच्या 2 हजार 91 चाचण्यांपैकी 50 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 173 पैकी 43 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळल़े यात मंडणगड-4, दापोली-6, खेड-10, गुहागर-3, चिपळूण-35, संगमेश्वर-3, रत्नागिरी-18, लांजा-5 तर राजापूर-9 असे तालुकानिहाय रूग्ण सापडले. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 74 हजार 974 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.39 इतका आह़े उपचारात असलेल्या 4 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यात खेड-1 रत्नागिरी-1, चिपळूण-1, संगमेश्वर-1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 180 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 71 हजार 184 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 94.94 इतके आह़े तर 1 हजार 479 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यात केवळ 273 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत़









