डिसेंबरच्या तुलनेत संख्या घटली
वृत्तसंस्था/ कोलकाता
गेल्या जानेवारीत जवळपास 64 लाखहून अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे. सदरच्या प्रवाशांनी देशांतर्गत स्तरावर प्रवास केला असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबरच्या तुलनेत प्रवाशांची संख्या तशी 43 टक्के कमीच राहिली असल्याचेही माहितीतून समोर आले आहे.
डिसेंबरमध्ये 1.12 कोटी लोकांनी देशांतर्गत विमान प्रवास केला होता. नागरि हवाई उड्डाण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत सर्वच भारतीय हवाई कंपन्यांच्या विमान सेवेला ग्राहकांनी कमी प्रतिसाद नोंदवला आहे. जानेवारी 2022 मध्ये स्पाइसजेट, इंडिगोच्या विमानांमधून जास्तीत जास्त प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केल्याचे दिसले आहे.
आंतरराष्ट्रीय विमान सेवा प्रभावीत
कोरोना महामारीमुळे भारत आणि इतर देशांमध्ये लावण्यात आलेले निर्बंध हे प्रवासी संख्या घटण्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. आता परिस्थिती सुधारली असून निर्बंध शिथील होत असून येत्या महिन्यांमध्ये प्रवासी संख्या लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.









