महिला खातेदार सर्वाधिक -मंत्री भागवत कराड यांची माहिती
नवी दिल्ली
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत 5.82 कोटी खाती निष्क्रिय असून यामध्ये महिलांची निष्क्रिय खात्यांची संख्या जवळपास 2.02 कोटीच्या (28 जुलै 2021 पर्यंत)घरात असल्याची माहिती आहे. ही आकडेवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून प्राप्त करण्यात आल्याचे अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.
अशा खात्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी मंत्री कराड म्हणाले की, आरबीआयच्या आर्थिक साक्षरता केंद्र तसेच ग्रामीण शाखा व जिल्हा तसेच पंचायतीच्या पातळीवर विविध शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महिला, शेतकरी, सुक्ष्म उद्योग, स्वयंरोजगार समूह, वरिष्ठ नागरिक तसेच अन्य शिबिरांचा यामध्ये समावेश असणार आहे.









