नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरच्या विमानतळाप्रमाणे सुसज्ज असलेल्या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. रेल्वेस्थानकाबरोबरच पंतप्रधानांनी गांधीनगर राजधानी-वाराणसी सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गांधीनगर राजधानी-वरेठा दरम्यान एमईएमयू या दोन नव्या टेनला हिरवा झेंडा दाखविला. तसेत पंतप्रधानांनी वडनगर येथील रेल्वेस्थानकाचे देखील उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला अनेक प्रकल्प भेट म्हणून दिले आहेत. गांधीनगरमधील गुजरात सायन्स सिटीमधील अ?Ÿक्वाटिक आणि रोबोटिक्स गॅलरी, नेचर पार्कचा यात समावेश आहे.
गांधीनगरमध्ये देशातील पहिले एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सुसज्ज असे रेल्वेस्थानक उभारण्यात आले आहे. विशेष प्रकाशयोजन, लक्झरी हॉटेल, लहान मुलांच्या खाण्या-पिण्यासाठी खोली अशा अनेक सुविधांनी सुसज्ज असे हे रेल्वेस्थानक आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष तिकिट आरक्षण, लिफ्ट, रॅम्प तसेच वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. येत्या काळात मनोरंजन केंदे, शॉपिंग सेंटर, खाद्यपदार्थाचे स्टॉल उघडण्याचे येथे नियोजन आहे. स्टेशन आवारात कलादालन देखील आहे.
रेल्वेस्थानकाची रचना एखाद्या विमानतळाप्रमाणे
फाईव्ह स्टार हॉटेलची निर्मिती करण्यात आलेले गांधीनगर कॅपिटल हे देशातील पहिले रेल्वेस्टेशन ठरले आहे. रेल्वे प्रवाशांना येथे दाखल होताच विमानतळावर आल्याचीच भावना निर्माण होईल अशी याची निर्मिती केली आहे. पंतप्रधान मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. गांधीनगर कॅपिटल रेल्वेस्टेशन आणि हॉटेलमध्ये सामाजिक तसेच पारिवारिक समारंभांच्या आयोजनासाठी वातानुकूलित हॉल आणि 1100 मीटर ओपन स्पेस ठेवण्यात आला आहे. स्टेशनवर तीन प्लॅटफार्म, दोन एस्कलेटर्स, तीन एलिव्हेटर व दोन प्रवासी सबवे बनवण्यात आले आहेत.









