प्रतिनिधी/ .खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सोनेरी रंगाचा दुर्मिळ कोळी आढळला. या दुर्मिळ कोळय़ाबाबत साऱयांनाच उत्सुकता असून प्राणी तज्ञांकडून याबाबत माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशेडी घाटात सेवा बजावणाऱया पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांना हा कोळी आढळून आला.
घरामध्ये आढळणारे कोळी आपल्या संरक्षणासाठी जाळे निर्माण करून त्याठिकाणीच राहतात. काही कोळी जंगलात आढळतात. सोनेरी रंगाच्या आढळलेल्या कोळय़ाबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र या सोनेरी रंगाच्या कोळय़ासून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा कोळी निरूपद्रवी असून कशेडी घाटात कसा आढळला? याबाबत तर्क लढवण्यात येत आहेत.









