मुंबई
देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने बांधकाम क्षेत्रातील कंपनी शापुरजी पालनजी यांच्यासोबत भागीदारी केली आहे. 25 फेबुवारीला या संदर्भात उभयतात सहकार्याचा करार करण्यात आला आहे. याअंतर्गत शापुरजी पालनजी यांच्या प्रकल्पातील घर खरेदीदारांना एसबीआय लवकरात लवकर कर्ज मंजुर करून देण्याची प्रक्रिया राबविणार आहे. याचा घर खरेदीदारांना भविष्य काळात फायदा होणार आहे. संबंधित ग्राहकांचे अर्ज पडताळणीनंतर लवकरात लवकर म्हणजे 5 दिवसात बँक गृहकर्ज मंजुर करू शकते. कर्ज घेताना कायदेशीर आणि इतर शुल्कांमधूनही ग्राहकांना सवलत मिळू शकणार आहे.









