कोलकाता
बॉश अँड सिमेन्स ब्रँड बीएसएच हाऊसहोल्ड अप्लायन्सने येणाऱया काळात भारतात 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. भारतीयांच्या पसंतीची उत्पादने कंपनीकडून येत्या काळात तयार केली जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मागच्या वर्षी बॉशच्या उत्पादनांना भारतीयांनी चांगला प्रतिसाद दर्शविला असल्याने कंपनीने उत्पादन निर्मितीवर लक्ष दिलंय. कोरोना काळात ग्राहकांनी उत्पादनांना पसंती दर्शवली आहे. मागच्या वर्षी बीएसएच इंडियाच्या उत्पादनांची विक्री 8 टक्के वाढीसह 1500 कोटी रुपयांची झाली आहे.









